चोपडेवाडी

ग्रामपंचायत चोपडेवाडी

ता. पलूस, जि.सांगली.

प्रस्तावना–

नावाविषयी माहिती–सुरुवातीला 100 वर्षापुर्वी भिलवडी येथील चोपडे कुटुंबीयांची वस्ती याठिकाणी होती. तद्नंतर माने, भोळे, यादव, मोरे, जाधव, तानगे, तळप या कुटुंबियांची वस्ती झाली. हयानंतर चोपडेवस्तीचे नामकरण चोपडेवाडी असे झाले सुरुवातीला भिलवडी माळवाडी, खंवाडी, चोपडेवाडी, सुखवाडी अशी ग्रुपग्रामपंचायत होती. 1966 मध्ये चोपडेवाडीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. सध्या सन 2001 च्या जनगणनेनुसार चोपडेवाडी गावाची लोकसंख्या 1265 इतकी आहे. कृष्णा नदीकाठावर वसलेले संपूर्ण बागायती शेती असलेले गाव आहे.