धार्मिक, सांस्कृतिक

–धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उत्सव–

  • चोपडेवाडी गावचे ग्रामदैवत लक्ष्मीची यात्रा अक्षयतृतीयेला भरते. यात्रेनिमित्त विविध स्पर्धा व करमणुकीचे कार्यक्रम आयोजित कले जातात त्यामध्ये बैलगाडी स्पर्धा व कलापथक सिनेमा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या यात्रेनिमित्त लक्ष्मी देवीची पालखीतून मिरवणूक वाजतगाजत गावातून काढली जाते आजपर्यंतचे वैशिष्ठ्य असे की कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी जातीय दंगली व अंतर्गत भांडणे मारामा–या झालेल्या नाहीत. तसेच यात्रेसाठी आजपर्यंत पोलीस बंदोबस्ताची गरज भासलेली नाही.

 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे राष्ट्रीय सणही मोठया उत्साहाने साजरे केले जातात. या राष्ट्रीय सणांना शाळेतील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम विविध कसरतीचे प्रयोग करत असतात.


 एक गाव एक गणपती:–

  • सन 1990 मध्ये गावामध्ये सार्वजनिक गणेशमंडळाची स्थापना केली असून तेव्हापासून आज असे एक गाव एक गणपती परंपरा सुरु आहे.

 इतर उपक्रम:–

  • गाव जरी लहान असले तरी इतरही बरेचशे लोकोपयोगी उपक्रम या गावामध्ये राबविले जातात. त्यामध्ये नेत्रतपासणी शिबीर, रक्तदान शिबिर, विविध विषयांवर व्याख्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.