विविध योजना

जलसिंचन योजना:–

  • गावाच्या पश्चिम बाजूने कृष्णा नदी बारमाही वाहते. गावातील व सहकारी तत्वावरील लिफ्ट इरिगेशन योजनेद्वारे शेतीला पाणीपुरवठा केला जातो. सहकारी पाणीसंस्था उत्तम पध्दतीने सुरु आहे. 12 महिने जलसिंचनाची सोय असलेने गाव हिरवेगार व इतर सर्व बाजूंनी समृध्द आहे.

नळपाणीपुरवठा योजना:–

  • माळवाडी, खंवाडी, चोपडेवाडी, प्रादेशिक योजनेतुन पाणीपुरवठा केला जातो. सदरची योजना ग्रामपंचयतीने संयुक्तपणे ताब्यात घेवून देखभाल व दुरुस्ती ग्रामपंचायतीमाफ‍र्त केली जाते. सांगली जिल्हांमध्ये एवढी मोठी योजना ग्रामपंचायती माफ‍र्त चालविली जाणारी एकमेव योजना आहे. प्रत्येक महिन्याला तिनही गावातून पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. जानेवारी 2001 पासून एकही पाणी नमुना खराब आलेला नाही.