सुविधा

पायाभूत सुविधा:–

 1. गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे.
 2. गाव आणि वस्त्यांना जोडण्यासाठी डांबरी रस्ते आहेत.
 3. रस्त्यावर पंचायतीच्या वतीने दिव्याची सोय केलेली आहे.
 4. संयुक्त नळपाणीपुरवठा योजनेतून गावाला व वस्त्यांना शुध्द पाणीपुरवठा केला जातो.
 5. काही ठिकाणचा अपवाद वगळता दिवासातून दोन वेळा मुबलक पाणी लोकांना दिले जाते.
 6. गावात सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे.
 7. सांडपाण्यासाठी गटारीची व्यवस्था आहे.

शैक्षणिक सुविधा:–

प्राथमिक शाळा:–

 • गावामध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व 1 वस्ती शाळा आहे.
 • गावातील शाळा 1.ली ते सातवीपर्यंत आहे.
 • प्राथमिक शाळेची इमारत जुन्या पध्दतीची कौलारु असली तरी प्रशस्त आणि सुस्थितीत आहे.
 • बोरबन वस्ती शाळा चौथीपर्यंत आहे. शाळेची इमारत नविन आर.सी.सी पध्दतीचे असून प्रशस्त आहे. दोन्ही शाळेसाठी पंचायतीमाफ‍र्त स्वच्छतागृहाची व पाणीपुरवठयाची व्यवस्था केलेली आहे.

अंगणवाडी:–

 • गावामध्ये व दुसरी बोरबन वस्ती आहे. दोन्ही अंगणवाडयासाठी पंचायतीने स्वच्छतागृहाची सुविधा व पाणीपुरवठयाची व्यवस्था केलेली आहे.
  1. याच प्राथमिक शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षक प्राचार्य, पत्रकार, सैनिक, राजकारणी व प्रगतशील शेतकरी झालेले आहेत. या गावचे नेते या शिवराम बापू यादव यांनी सलग 25 वर्षे चोपडेवाडी गावचे सरपंच म्हणून काम पाहिले आहे. तसेच अशिया खंडातील सर्वात मोठया स्तरावर कारखान्याचे ब–याच वर्षे संचालक म्हणून काम पहिले आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक होते. आजपर्यत गावातील ग्रामपंचायत व सेवा सोसायटी व पाणीपुरवठा संस्थेच्या निवडणूका त्यांच्याच नेतृत्वाखाली बिनविरोध झालेल्या आहेत.

गावातील समस्या:–

 • बोरबन वस्तीसाठी योग्य दाबाने पाणीपुरवठा करणेसाठी पाईपलाईन अंदाजे 800 मीटर लांबी लागेल.
 • गावातील काही भागात गटारी नाहीत त्याठिकाणी गटारी बांधणे आवश्यक आहे. स्मशानभूमी शेडची आवश्यकता आहे.
 • बोळा रस्ते कोंक्रीटसाठी निधी आवश्यक आहे.
 • क्रिडांगणासाठी जागा.